Manaat Jagaat 5 Books Marathi Set
Manaat Jagaat 5 Books Marathi Set
मन जिंका.... जग जिंका
प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते, आधी आपल्या मनात आणि मगच वास्तवात....
विचार येत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. कोणतीही गोष्ट कृतीमध्ये येण्याआधी ती विचारांमध्ये येत असते. जर विचारांना योग्य दिशा देण्याची कला अवगत झाली तर साहजिकच कृतीमध्ये बदल घडेल व त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. आपल्या आंतरिक शक्तींना ओळखून यशस्वी होण्याचा मार्ग सांगणार्या पाच मराठी पुस्तकांचा संच.
1) मनाची शक्ती कशी वापराल.... (जे तुमच्या मनात तेच तुमच्या जगात)
2) मनाची कल्पनाशक्ती कशी वापराल..... (पॉवर ऑफ इमॅजिनेशन)
3) NLP भाग १
4) स्टॉप ओवरथिंकिंग (अतिविचाराच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी......)
अतिविचारने समस्या तर सुटतच नाहीत, उलट मानसिक स्वाथ्य बिघडते. अस्वस्थता येते आणि आपण नकळत अतिविचाराच्या चक्रात अडकतो. परिणामी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हानी होते. आणि याचे परिणाम बराच काळ आपल्याही नकळत आपल्यासोबत राहतात. अतिविचाराने ताण वाढतो, नकारात्मकता वाढते आणि आपण वर्तमानापासून दूर जातो. अतिविचाराचे शारीरिक परिणाम तर खूपच घातक आहेत. हृदयाची धडधड वाढणं, चक्कर येणं, थकवा येणं, चिडचिड होणं, उदास वाटणं, डोकेदुखी, स्नायूंवर ताण येणं, यांसारखी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. ‘स्टॉप ओव्हरथिंकिंग’ हे पुस्तक आपल्याला आपण अतिविचाराच्या चक्रात कसे अडकतो याची जाणीव तर करून देतेच पण त्याचबरोबर या चक्रातून बाहेर पडण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी उपयुक्त अशी 23 तंत्रे आपल्यासमोर ठेवते. शारीरिक, मानसिक पातळीवर काम करणारी ही तंत्रे अतिविचाराच्या विळख्यातून बाहेर काढतात आणि आपल्याला एक नवीन दृष्टिकोन प्रदान करतात. आपलं वैचारिक भरकटलेपण कमी करतात, आपल्याला भावनिक शिस्त लागते आणि आपण अंतर्बाह्य शांत होतो. अतिविचार करून स्वतःला स्वतःच्याही नकळत त्रास करून घेणार्या प्रत्येकासाठी अतिशय मार्गदर्शक असे हे पुस्तक आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करते. या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे......
* अतिविचारांचे परिणाम
* तणाव दूर करण्याचा फॉर्म्युला
* तणावाची रोजनिशी
* वेळ, ऊर्जा आणि इनपुट्सचं व्यवस्थापन
* क्षणार्धात उत्साह मिळवण्यासाठी