जीवनात बदल घडवून आणणाऱ्या आठ पुस्तकांचा संच

Regular price
Rs. 1,750.00
Regular price
Rs. 1,960.00
Sale price
Rs. 1,750.00
Unit price
per
१) २१ ग्रेट लीडर्स.....
(विश्वावर ठसा उमटवणाऱ्या नेतृत्वांची कार्यशैली)
या पुस्तकात 21 नेत्यांची चरित्रे दिली आहेत. यापैकी प्रत्येक जण नेतृत्वाच्या 7 पैलूंपैकी एखाद्या विशिष्ठ गुणांनी युक्त असे आहेत. वॉल्ट डिस्ने ही दूरदृष्टीची व्यक्ती, रोझा पार्क अन्यायाविरुद्ध लढा देणारी, स्टीव्ह जॉब्ज अपयशाचा सामना करणारे वगैरे. या नेत्यांपैकी कुणीच परिपूर्ण नव्हते. तुमच्या आमच्या सारखेच ते सर्वसामान्य होते. पण त्यांच्यातील सद्गुण, त्यांनी त्रुटींवर केलेली मात, संकटांचा केलेला सामना हे नक्कीच अनुकरणीय आहे. त्यांच्याकडून नेतृत्वाचे मिळणारे धडे मौल्यवान आहेत. तुम्हाला एखाद्या खेळाच्या टीमचे नेतृत्व करायचे आहे, औद्योगिक क्षेत्रात किंवा कंपनीत नेतृत्व करायचे आहे किंवा देशाचे नेतृत्व करायचे आहे तर त्या संदर्भातील उत्तम आदर्श कोणते हे समजून घ्या.
प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रत्येक लीडरकडून मिळणारे नेतृत्वाचे दिले आहेत. त्याचा आपण आपल्या आयुष्यात वापर करू शकतो.
* नेतृत्वाचे सात पैलू
* महान लीडर्सची स्वभाववैशिष्ट्ये
* जीवनशैलीतून मिळणारे मार्गदर्शन
* 21 लीडर्स आणि त्यांचे गुणविशेष
* त्यांच्या जीवनातील प्रेरणादायक प्रसंग
* प्रत्येक लीडरकडून मिळणारे नेतृत्वाचे धडे आणि संदेश
२) इकिगाई......
(Art of staying Young.. while growing Old..)
जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.
३) असे घडवा तुमचे भविष्य......
( विचारांना नवी दिशा देणारं प्रेरणादायी पुस्तक)
२००२ पासून २००७ पर्यंत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताचं राष्ट्रपती पद भूषवलं. राष्ट्रपती पदावर असताना ते जितके लोकप्रिय होते तितकेच आजही आहेत. प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन यासाठी किंवा त्यांच्याशी असलेलं एक आपुलकीचं नातं म्हणून लोक त्यांच्याशी संपर्क साधत. त्यांचे विचार, त्यांची जीवनमूल्यं, समस्यांना दिलेली उत्तरे ही, जीवनाच्या खडतर वाटेवरून चालताना खरेपणाच्या कसोटीवर उतरलेली त्यांची शिकवण आहे, ज्यापासून आपण खूप काही शिकू शकतो.
वैयक्तिक विकासाच्या आव्हानापासून (ज्याला आपण आपल्या जीवनात रोज सामोरं जातो.) ते समाजिक आणि राष्ट्रीय बहुआयामी कठीण प्रश्नांचा सामना करण्यापर्यंत, हे पुस्तक संपूर्ण आणि सार्थक जीवन जगण्याची प्रेरणा देते.
४) मनाची कल्पनाशक्ती कशी वापराल.....
(पॉवर ऑफ इमॅजिनेशन)
आपण जेव्हा आपल्या मनात एखादा विचार धरून ठेवतो, तो विचार ज्वलंत असतो, मनाला दिलेलं चित्र जेव्हा ज्वलंत असतं तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर तर होतोच होतो त्याचबरोबर आजूबाजूच्या वातावरणावर, आजूबाजूच्या परिस्थितीवर, आजूबाजूच्या जगावरदेखील होतो. आणि ती वस्तू, ती गोष्ट, ती घटना आपण सहजतेने आपल्या स्वतःच्या आयुष्यात आकर्षित करतो.
यामागे काय रहस्यं काम करतात, हे या पुस्तकात पाहायला मिळेलच मिळेल. त्याचबरोबर हे रहस्य वापरताना काय तत्त्वं सांभाळायची आणि कुठले नियम पाळायचे हेही आपल्याला कळेल. या पुस्तकात विचारांच्या शक्तीबरोबर चित्रांची शक्ती कशी कार्य करते हे समजेल.
मनाला दिलेलं प्रत्येक चित्र ऊर्जा तयार करतं; मग ती ऊर्जा कधी सकारात्मक असते तर कधी नकारात्मक. आणि त्या ऊर्जेचं रूपांतर आपण हवं त्या ठिकाणी, हव्या त्या वेळी कसं करू शकतो हे रहस्यही आपल्या समोर उलगडून येईल.
५) योग्य निर्णय कसे घ्यावे......
(योग्य निर्णय घेऊन यशस्वी होण्याची कला)
यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तींमध्ये फरक असतो तो फक्त निर्णयाचा. यशस्वी व्यक्ती आपल्या जीवनातील अधिकतर निर्णय योग्य घेते तर अयशस्वी व्यक्तीचे बहुतेक निर्णय चुकीचे सिद्ध होतात. हेच कारण आहे, की ज्यामुळे बरेच लोक कठोर मेहनत करूनही हव्या त्या गोष्टी प्राप्त करू शकत नाहीत. हे पुस्तक यश आणि अपयशातील नेमके हेच अंतर मिटवते.
लेखकाने अतिशय रोचकपणे, यशस्वी लोकांची उदाहरणे देत आणि केस स्टडीज् द्वारे योग्य निर्णय घेण्याचे फॉर्म्युले सादर केले आहेत.
६) इचिगो इची.....
(प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत....)
'प्रत्येक क्षण वर्तमानात जगा', आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना जीवनात एकदाच घडत असते. यामुळेच प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्याची एखाद्या खजिन्यासारखी साठवण करायला हवी.
इचिगो इची या प्रेरणादायी पुस्तकामध्ये आपल्याला जपानी जीवनशैलीतून कित्येक गोष्टी शिकायला मिळतात. जसं की,
*भूतकाळ आणि भविष्यकाळापासून मुक्त होऊन वर्तमानातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय आणि अद्वितीय कसा करायचा?
*स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे झेन तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये कसे आत्मसात करावे ?
* योगायोग वाटणाऱ्या गोष्टींमागील संकेत कसे समजून घ्यावेत
* जागरुकतेच्या जादूची किमया कशी अनुभवावी ?
* वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये 'इचिगो इची क्षण कसे निर्माण करावेत?
*जीवनामध्ये फ्लोची अवस्था आणून सर्जनशीलतेचा प्रवाह कसा निर्माण करावा?
*माईंडफुलनेसला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा बनवावा?
७) फॉरेस्ट बाथिंग......
(हरित वनातील स्नान)
ऊर्जा पुनः प्राप्त करण्याची 'शिनरिन-योकु' पद्धती.
इकिगाई' या जागतिक बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी लिहिलेले पुस्तक.